अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत ‘चित्रकर्मी पॅनेल’ मैदानात
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ‘चित्रकर्मी पॅनेल’ने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. चित्रपटसृष्टीतील विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे हे पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, राज्यभरातील चित्रकर्मींचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर या महामंडळाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी समाधान व्यक्त केले आहे.
चित्रकर्मी पॅनेलमध्ये निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, छायाचित्रकार, ध्वनी, रंगभूषा, प्रसिद्धी, नृत्यदिग्दर्शन, कला विभाग आणि कामगार गटातील प्रतिनिधींचा समावेश आहे.
चित्रकर्मी पॅनेलचे उमेदवार
- विजय शिंदे (कोल्हापूर)
- गणेश तळेकर (मुंबई)
- सतीश रणदिवे (मुंबई)
- विजय राणे (मुंबई)
- पितांबर काळे (मुंबई)
- आनंद काळे (कोल्हापूर)
- महेश देशपांडे (सातारा)
- मिलिंद अष्टेकर (कोल्हापूर)
- निलेश बुट्टे (पुणे)
- सदानंद सूर्यवंशी (कोल्हापूर)
- प्रकाश जाधव (मुंबई)
- अनिल सुतार (मुंबई)
- सतीश बिडकर (कोल्हापूर)
- रणजित जाधव (कोल्हापूर)
पॅनेलचे निवडणूक चिन्ह ‘कपबशी’ असून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आणि सर्व घटकांना न्याय देण्यासाठी काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
महामंडळाची निवडणूक ७ जून २०२६ रोजी होणार असून कोल्हापूर, पुणे, मुंबई, पंढरपूर आणि नाशिक येथे मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Post a Comment