शिवगर्जना आयोजित उन्हाळी शिबिराचा समारोप उत्साहात

 

शिवगर्जना आयोजित उन्हाळी शिबिराचा समारोप उत्साहात



कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क 

शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराचा सांगता समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, किशोर देशपांडे (सावली केअर सेंटर), प्रताप पाटील (प्रसार माध्यम मीडिया समूह अध्यक्ष), सौ. सुषमा जरग (नगरसेविका), डॉ. विशाल धापसे, प्रशांत जरग, दीपक देशपांडे, राजेंद्र मकोटे, प्रकाश पाटील व बबन मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरामध्ये शिवकालीन युद्धकला, सर्वांगसुंदर व्यायाम, योगा, वुशू, थांग-ता, ज्युडो तसेच रायफल शूटिंग यांसारख्या विविध क्रीडा व कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिरातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून कश्वी माने, आयुष्यमान कुपटे, अद्विक विचारे, कादंबरी पाटील, शिवबा जाधव, राधिका कोरे, विराज गवळी, श्लोक शेळके, साईराज यादव व सिद्धी चौगुले यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



तसेच प्रमुख प्रशिक्षक सुमित भोसले, सतीश वडणगेकर, धैर्यशील देसाई व मानसी सावंत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थापक अध्यक्ष नाना सावंत यांच्यासह सागर लोहार, अजय चौगुले, राहुल भोसले, राजेश पाटील, अतुल निंबाळकर, युवराज टाक, पूर्वा भोसले, अर्जुन वाडेकर, मल्हार सावंत, वृंदा सावंत, जान्हवी लोहार, अवधूत लोहार, शुभम सनगर, स्वरा निंबाळकर, जान्हवी निंबाळकर व परी लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या शिबिरात पारंपरिक लाठी-काठी, लेझीम, धनुर्विद्या यांसह ज्युडो आणि रायफल शूटिंगपर्यंत विविध प्रशिक्षण देण्यात आल्याने पालकवर्गाने संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

Comments