भर दुपारी दसरा चौक रोडवर जनरेटरला आग; अग्निशामन दलाने वेळेत नियंत्रण मिळवले

 

भर दुपारी दसरा चौक रोडवर जनरेटरला आग; अग्निशामन दलाने वेळेत नियंत्रण मिळवले



कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क 

शहरातील गजबजलेल्या दसरा चौक रोड परिसरात आज भर दुपारी अचानक जनरेटरला आग लागल्याची घटना घडली. रस्त्या लगत असणाऱ्या जनरेटरला आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.



मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यालगत असलेल्या जनरेटरमधून अचानक धूर व ज्वाळा बाहेर पडू लागल्या. दुपारची वेळ असल्याने परिसरात मोठी वर्दळ होती. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही नागरिकांनी तत्काळ अग्निशामन दलाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, जनरेटरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

या प्रसंगामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

Comments