स्वतःच्या आवडीचे करिअर निवडा, उद्याचा विचार करा; योग्य दिशा निवडल्यास यशस्वी भविष्य घडवता येते : रविंद्र खैरे

 स्वतःच्या आवडीचे करिअर निवडा, उद्याचा विचार करा; योग्य दिशा निवडल्यास यशस्वी भविष्य घडवता येते : रविंद्र खैरे



शहीद महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद


कोल्हापूर (टिटवे)२५  सिटी न्यूज नेटवर्क 


       करिअर निवडताना केवळ आजच्या संधी नव्हे तर उद्याच्या गरजा आणि स्वतःच्या आवडीनुसार निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास कोणतेही क्षेत्र उज्ज्वल भविष्य घडवू शकते, असे प्रतिपादन रविंद्र खैरे यांनी केले.



    शहीद महाविद्यालयाच्या वतीने राधानगरी व तारळे येथे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित  करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.

           यावेळी शहीद महाविद्यालयाच्या  राधानगरी व तारळे परिसरातील प्लेसमेंट झालेल्या  विद्यार्थिनीचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. 


    या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअर संधी, आवश्यक कौशल्ये, बदलते तंत्रज्ञान व त्याचा भविष्यातील परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “स्वतःची आवड ओळखून शिक्षणाची दिशा ठरवली, तर कामात समाधान मिळते आणि यशाची शक्यता अधिक वाढते,” असेही त्यांनी नमूद केले.


       शिक्षण, आर्क्रिटेचर, डी. एम.एल.टी.,माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पर्यावरण अभ्यास, मीडिया, उद्योजकता आदी क्षेत्रांमधील वाढत्या संधींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या शंका मोकळेपणाने मांडत संवाद साधला.


       कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. यावेळी प्राचार्य हिमांशु चव्हाण, उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. विशालसिंह कांबळे, प्रा. मयुरी महेकर,राजेंद्र चव्हाण, विठ्ठल चव्हाण,दत्तात्रय शेटके,अवधूत कलिकत्ते,स्वप्नील कुंभार, शिक्षकवृंद तसेच दहावी-बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. अविनाश पालकर यांनी केले.

Comments