शालेय बुद्धिबळ स्पर्धेत प्रेम निचळ अजिंक्य; ध्रुव गोयल उपविजेता

 

शालेय बुद्धिबळ  स्पर्धेत प्रेम निचळ अजिंक्य; ध्रुव गोयल उपविजेता



कोल्हापूर (कागल) १८ सिटी न्यूज नेटवर्क 

अनुज चेस अकॅडमी आणि डी. आर. माने महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे १६ वर्षांखालील शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन आप्पासाहेब पाटील (गडहिंग्लज) आणि सुरेश पाटील यांच्या हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले.

स्पर्धेत एकूण सहा फेऱ्या खेळविण्यात आल्या. प्रेम निचळ आणि आदर्श चौगुले यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्यानंतर प्रेम निचळ याने ६ पैकी ५.५ गुणांसह अजिंक्यपद पटकाविले. ध्रुव गोयल याने ऋतुजा हेंडगेवर विजय मिळवत ५ गुणांसह उपविजेतेपद मिळविले.

स्पर्धेतील अन्य विजेते पुढीलप्रमाणे :
तृतीय – सुबोध कुलकर्णी (५ गुण), चौथा – अध्विक विचारे (४.५ गुण), पाचवा – आराध्य नाईक (४.५ गुण), सहावा – शौर्या वनिरे (४ गुण), सातवा – हर्षवर्धन चोथे (४ गुण), आठवा – ओम इंगळे (४ गुण), नववा – श्रेयस कांबळे (४ गुण) आणि दहावा – आर्यन माने (४ गुण). उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून शमिता पाटील हिचा गौरव करण्यात आला.

वयोगटानुसार झालेल्या स्पर्धांमध्ये ८ वर्षांखालील गटात स्वरा माने प्रथम, दक्ष देवकर द्वितीय तर श्लोक देसाई तृतीय ठरला. १० वर्षांखालील गटात शिवम साबळे प्रथम, पार्थ सुतार द्वितीय आणि संस्कार वणीरे तृतीय आला. १२ वर्षांखालील गटात ऋतुजा हेंडगे प्रथम, रणवीर पुनुगडे द्वितीय तर आर्यन चव्हाण तृतीय ठरला. उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून त्रिशिका मोहिते हिची निवड करण्यात आली.

१४ वर्षांखालील गटात आदर्श नाईक प्रथम, विवान क्षीरसागर द्वितीय आणि अथर्व आंबी तृतीय ठरला. उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून वेदिका चौगुले हिचा गौरव करण्यात आला.

अनुज चेस अकॅडमी विजेत्यांमध्ये सौरभ घुले प्रथम, आरव जाधव द्वितीय तर फजल मुजावर तृतीय ठरला. शुभ्रा पाटील आणि शिवाजी रायकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेत एकूण ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. पंच म्हणून बाबूराव पाटील यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभ शशिकांत घुले, मल्हारी कुलकर्णी, गंगाराम निचळ आणि कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव कृष्णात पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी डी. आर. माने महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. श्रीनिवास पाटील, प्रा. संग्राम तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अनुराग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments