अष्टपैलू कार्याबद्दल बबीता जाधव यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार’

 

अष्टपैलू कार्याबद्दल बबीता जाधव यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार’



कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क 

कला, क्रीडा, पर्यावरण, शैक्षणिक, महिला सबलीकरण, साहित्य, मानवता, स्वच्छता अभियान आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणाऱ्या कोल्हापूरच्या बबीता दिलीप जाधव यांना यंदाचा मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.



बबीता जाधव या जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीच्या संस्थापक-सल्लागार तसेच जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन २ क च्या विद्यमान को-ऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, शिक्षण व स्वच्छता अभियानांत त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.



नुकताच  बेळगाव (कर्नाटक) येथील मुक्ती मठ सभागृहामध्ये आयोजित ९८ व्या राष्ट्रीय काव्य संमेलन व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील नामांकित व आघाडीच्या संस्थांनी संयुक्तपणे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या सोहळ्याच्या आयोजनामध्ये डॉ. सुरेश (डी.एस.) राठोड फाउंडेशन सर्किट बेंच, शांतिदूत परिवार, इंडियन पोलीस मित्र भारत तसेच विशेष कार्यकारी अधिकारी न्याय हक्क जनजागृती फेडरेशन यांचा प्रमुख सहभाग होता.

या प्रसंगी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बबीता जाधव यांच्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments