आजचे राशीभविष्य


आजचे राशीभविष्य 

 🌞 बुधवार, ६ मे २०२६




 वैशाख कृष्ण चतुर्थी / पंचमी

पराभव नाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२


🌙 चंद्र – धनु राशीत

🌟 नक्षत्र – मूळ / (दुपारी ३.५४ नंतर) पूर्वाषाढा. 


🪔 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 (संपर्क – 8087520521)


⏰ राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०


 आज चांगला दिवस आहे.

ग्रहयोग – चंद्र त्रिकोण बुध, चंद्र केंद्र शनी, चंद्र केंद्र नेपच्यून


६ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जन्मताच कलासक्त आणि स्वतः एक कलाकार आहेत. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि व्यापारा साठी आवश्यक तो धूर्तपणा तुमच्या मध्ये आहे. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून त्याचा व्यवहारात चांगला उपयोग होतो. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे आणि तुम्ही लोक प्रिय आहात. तुमच्या बोलण्यामध्ये मोहक पण आहे. आणि तुमचा मित्रमंडळींचा सर्कल मोठा असते. तुमच्या रूढी आणि परंपरा संबंधीत कल्पना इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या असल्या तरी तुम्हाला त्या आवडतात आणि इतरांना त्या समजून घेणे जरा कठीण जाते. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. तुमच्या उद्दिष्टापासून तुम्ही बाजूला होत नाही. तुम्ही बोलण्यात हुशार आहात. तुम्हाला कीर्ती आणि मानसन्मान मिळतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, समारंभांमध्ये, सामाजिक कार्यात भाग घेणे तुम्हाला आवडतं. तुम्ही इतरांना आनंदाने मदत करतात. धार्मिक आणि तत्वज्ञान विषयाची तुम्हाला आवड असते. तुमचे आयुष्य कमी कष्टाचे जाते. तुम्ही उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य, दागिने, वाहने, कपडे वापरतात. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही संशयी असतात.

 

व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृहसजावट, बँकिंग, वैद्यकीय प्रयोगशाळा, उपकरणे.

 केमिस्ट, पॅथॉलॉजी.


 शुभ दिवस: सोमवार, मंगळवार, गुरुवार. 


शुभ रंग: निळा.


 शुभ रत्न:-  पाचू, मोती, हिरा.


🐏 मेष (Aries)

आज कामात प्रगती होईल. नवीन योजना यशस्वी ठरतील. आत्मविश्वास वाढेल.

💡 उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा


🐂 वृषभ (Taurus)

आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

💡 उपाय: लक्ष्मी पूजन करा


👬 मिथुन (Gemini)

संवादातून लाभ होईल. नवीन ओळखी निर्माण होतील. कामात गती येईल.

💡 उपाय: विष्णू मंदिरात दीपदान करा


🦀 कर्क (Cancer)

मन प्रसन्न राहील. सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल.

💡 उपाय: शिवलिंगावर जल अर्पण करा


🦁 सिंह (Leo)

मित्रांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. प्रतिष्ठा वाढेल.

💡 उपाय: सूर्याला अर्घ्य द्या


🌾 कन्या (Virgo)

कार्यस्थळी यश मिळेल. वरिष्ठांची कृपा राहील. नवीन संधी मिळतील.

💡 उपाय: हिरव्या मूग डाळीचे दान करा


⚖️ तुळ (Libra)

भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात मन लागेल.

💡 उपाय: विष्णूला पिवळे फुल अर्पण करा


🦂 वृश्चिक (Scorpio)

संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. अचानक बदल संभवतात.

💡 उपाय: हनुमानाला सिंदूर अर्पण करा


🏹 धनु (Sagittarius)

तुमच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. कामात यश मिळेल.

💡 उपाय: केशर तिलक लावा व विष्णू पूजन करा


🪶 मकर (Capricorn)

कामात व्यस्त राहाल. मेहनतीचे फळ मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल.

💡 उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा


🏺 कुंभ (Aquarius)

सर्जनशील कामात यश मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. आनंदी वातावरण राहील.

💡 उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा


🐟 मीन (Pisces)

घरगुती वातावरण चांगले राहील. आई-वडिलांची साथ मिळेल. मानसिक समाधान मिळेल.

💡 उपाय: विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments