जी एच रायसोनी स्मृती सात वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अद्विता, माऊली, शिवराज, वेदांत, रियांश व प्रज्वल आघाडीवर
जी एच रायसोनी स्मृती सात वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अद्विता, माऊली, शिवराज, वेदांत, रियांश व प्रज्वल आघाडीवर
कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क
अयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा सात वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आज प्रारंभ झाल्या. जयसिंगपूर, इचलकरंजी व कोल्हापूर येथील नामांकित 20 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्विस् लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार मुले आणि मुलींच्या स्वतंत्र गटात या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेतून दोन मुलांची व दोन मुलींची निवड पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर सुधीर गिरी व आदिल शेख यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारूलकर व कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी उपस्थित होते.
आज झालेल्या दुसऱ्या फेरीनंतर मुलांच्या गटात शिवराज कामते कोल्हापूर, वेदांत हलबे कोल्हापूर, रियांश गिरगावकर कोल्हापूर व प्रज्वल पाटील कोल्हापूर हे चौघेजण दोन गुणांसह आघाडीवर आहेत तर मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीनंतर जयसिंगपूरची अद्विता देसाई व कोल्हापूरची माऊली हिरवडेकर या दोघीजणी दोन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.

Comments
Post a Comment