जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा नऊ व तेरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी व बुधवारी कोल्हापुरात
जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा नऊ व तेरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी व बुधवारी कोल्हापुरात
कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क
चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा नऊ वर्षाखालील मुला मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक 24 मे रोजी आयोजित केली आहे तर तेरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा बुधवार दिनांक 27 मे रोजी आयोजित केली आहे. सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. अयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर येथे होणाऱ्या या दोन्ही निवड स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहेत.
नऊ वर्षाखालील स्पर्धेसाठी एक जानेवारी 2017 ला किंवा त्यानंतर जन्मलेले कोल्हापूर जिल्ह्यातील मुले मुली भाग घेऊ शकतात तर तेरा वर्षाखालील स्पर्धेसाठी एक जानेवारी 2013 ला किंवा त्यानंतर जन्मलेले कोल्हापूर जिल्ह्यातील मुले मुली भाग घेऊ शकतात. या दोन्ही स्पर्धेतून दोन मुलांची व दोन मुलींची निवड छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नऊ वर्षाखालील व सोलापूर येथे होणाऱ्या तेरा वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी मुले व मुलींच्या प्रत्येक गटात पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे 1000/- , 600/- , 400/- व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.याव्यतिरिक्त दोन्ही स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून चषक दिले जाणार आहे. राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूस राज्य स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात येणार आहे.
तरी कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक बुद्धिबळपटूंनी आपली नावे दोनशे रुपये प्रवेश फी सह स्पर्धेच्या एक दिवस अगोदर पर्यंत खालील व्यक्तींकडे नोंदवावीत. 1) आरती मोदी- 8149740405, 2)मनिष मारुलकर-9922965173 3)उत्कर्ष लोमटे - 9923058149,
4) प्रीतम घोडके - 8208650388, 5)रोहित पोळ - 9657333926
*स्पर्धेत येताना खेळाडूंनी दुपारच्या जेवणा चा डबा घेऊन यावे*
.jpeg)


Comments
Post a Comment