आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

🌞 बुधवार, २० मे २०२६




अधिक ज्येष्ठ चतुर्थी / पंचमी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज उत्तम दिवस आहे."


🌙 नक्षत्र - आर्द्रा / (सकाळी ६.१२ नंतर) पुनर्वसू.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन / (रात्री १०.३९ नंतर) कर्क. (शूल योग, विष्टी करण अशुभ) 


🔭 चंद्र युती गुरू.


टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरूशी शुभ योग आहे. अनुकूल ग्रहमान आहे. गृहसौख्य लाभेल. एखादी आनंदाची बातमी मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. नवीन योजना यशस्वी होतील. आध्यात्मिक विषयात रुची निर्माण होईल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) रात्री तृतीय स्थानी चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. प्रवासाचे योग संभवतात. मित्र आणि भावंडांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन कल्पनांमुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र गुरू युती आहे. मन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक आवक वाढेल. समाजात मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना आणि कलाकारांना विशेष यश मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) दिवसभर व्यय स्थानी चंद्र आहे. काही मनासारखी कामे पूर्ण होतील. दानधर्म करण्यास उत्सुक राहाल. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. रात्रीनंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने आत्मविश्वास वाढेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक आवक वाढेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रेमसंबंधात आनंददायक घटना घडतील.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) दशम स्थानी चंद्र आहे. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. महिलांकडून सहकार्य लाभेल. आज घेतलेले निर्णय पुढे लाभदायक ठरतील.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवम स्थानी चंद्र आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. भाग्याची साथ लाभेल. तीर्थयात्रेचे योग संभवतात. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. मनातील नकारात्मक विचार दूर होतील. अभ्यासासाठी चांगला दिवस आहे.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) अष्टम स्थानी चंद्र आहे. संमिश्र ग्रहमान आहे. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. आरोग्याची काळजी घ्या. मात्र संशोधन आणि गूढ विषयात प्रगती होईल. अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारी व्यवसायात लाभ संभवतो. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. काही गैरसमज दूर होतील. आर्थिक व्यवहारात यश मिळेल.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीत अधिकार वाढतील. महिलांकडून लाभ होतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) पंचम स्थानी चंद्र गुरू युती आहे. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. प्रेमसंबंधात यश लाभेल. कला आणि सर्जनशील क्षेत्रात विशेष प्रगती होईल. शेअर्स आणि गुंतवणुकीतून लाभ संभवतो.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती वातावरण आनंददायक राहील. वास्तू आणि वाहनसुख लाभेल. आईच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील. महत्वाचे निर्णय आज यशस्वी ठरतील.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments