जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा सात वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत शिवराज कामते व अद्विता देसाई अजिंक्य तर वेदांत हळबे व इनाया मुजावर उपविजेते

 जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा सात वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत शिवराज कामते व अद्विता देसाई अजिंक्य तर वेदांत हळबे व इनाया मुजावर उपविजेते




    कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 

चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा सात वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आज आयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. मुलांच्या गटात अंतिम चौथ्या फेरीनंतर कोल्हापूरच्या शिवराज कामतेने चार पैकी चार गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले तर कोल्हापूरच्याच वेदांत हळबे तीन गुण व साडेनऊ टायब्रेक गुणासह उपविजेता ठरला. मुलींच्या गटात अंतिम चौथ्या फेरीनंतर जयसिंगपूरच्या वेदांती देसाई ने चार गुण मिळवून विजेतेपद मिळविले तर कोल्हापूरच्या इनाया मुजावर ला तीन गुणांसह उपविजेते पद मिळाले. हे चौघेजण 30 व 31 मे दरम्यान पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हाचे अधिकृत प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रिया हिरवडेकर व अदिती पिळणकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भरत चौगुले व मनिष मारुलकर उपस्थित होते. एकूण रोख चार हजार रुपये व चषक बक्षीस म्हणून देण्यात आले. जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन व कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन ने या स्पर्धा पुरस्कृत केल्या होत्या तर युनिव्हर्सल सेक्युरिटी चे कॅप्टन उत्तम पाटील यांनी या स्पर्धेसाठी हॉल उपलब्ध करून सहकार्य केले. 

        उत्तेजनार्थ बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे

    मुले :- 1) रियांश गिरगावकर कोल्हापूर 2) रिशान पिळणकर कोल्हापूर 3)रियांश चौगुले कोल्हापूर व 4) श्रेयस पांडव इचलकरंजी                                                           मुली : 1) माऊली हिरवडेकर कोल्हापूर, 2) हिंदवी पाटील कोल्हापूर, 3) राजमुद्रा भोसले कोल्हापूर 4) राजनंदिनी गिरी कोल्हापूर व 5) निहारिका कांबळे कोल्हापूर

Comments