“देशहित प्रथम… वाढदिवस साधेपणाने”; सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटगे यांचा आदर्श उपक्रम
कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते किशोर विजया जयवंतराव घाटगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व औपचारिक कार्यक्रम रद्द करून सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती घाटगे यांनी दिली.
मंगळवार, दि. १९ मे रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता उत्तरेश्वर थाळी येथे भोजन व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता पंचगंगा नदी घाट येथे पंचगंगा नदीची महाआरती होणार असून त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटगे हे विवेकानंद ट्रस्टच्या माध्यमातून “एक राखी जवानांसाठी” हा देशहिताचा उपक्रम गेली २० वर्षांहून अधिक काळ सातत्याने राबवत आहेत. समाजसेवा, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी वाढदिवसालाही सामाजिक उपक्रमांची जोड दिली आहे.
“देशहित प्रथम आणि त्यानंतर सर्वकाही” हा आदर्श समाजात नव्या रूपाने रूढ व्हावा, या भावनेतून आपण वाढदिवस साधेपणाने साजरा करत असल्याचे किशोर घाटगे यांनी सांगितले.

Comments
Post a Comment