कागलमध्ये रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धा

 

कागलमध्ये रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धा



कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क 

कागल येथे रविवार, दि. १७ मे रोजी १६ वर्षांखालील मुला-मुलींसाठी एकदिवसीय शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनुज चेस अकॅडमी व डी. आर. माने महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे होणार आहे.

स्पर्धा १६ वर्षांखालील वयोगटासाठी एकत्रित स्वरूपात घेण्यात येणार असून पात्रता जन्मतारीख १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर अशी आहे. तसेच उपविभागीय बक्षिसे १४ वर्षांखालील (१ जानेवारी २०१२ नंतर), १२ वर्षांखालील (१ जानेवारी २०१४ नंतर), १० वर्षांखालील (१ जानेवारी २०१६ नंतर) आणि ८ वर्षांखालील (१ जानेवारी २०१८ नंतर) गटांसाठी दिली जाणार आहेत.

स्पर्धेसाठी सहभाग नोंदणीची अंतिम तारीख १६ मे आहे. स्पर्धकांनी स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक व टिफिन सोबत आणून सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कृष्णात पाटील (९४२११०४६५०), बाबूराव पाटील (९४२२७९०४९५), डॉ. श्रीनिवास पाटील (९४२२४१५८१८), प्रा. संग्राम तोडकर (९४२२०४५७४१), तसेच अनुष्का पाटील व अनुराग पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Comments