रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रयत्नांतून ३ हजार गावांच्या जीवनमानात सकारात्मक बदल
नवी दिल्ली, ११ सिटी न्यूज नेटवर्क
Reliance Foundation आणि Observer Research Foundation (ORF) यांच्या संयुक्त अभ्यासातून देशातील सुमारे ३ हजार गावांमध्ये गेल्या दहा वर्षांत ग्रामीण जीवनमान आणि उपजीविकेत लक्षणीय सुधारणा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या अभ्यासामध्ये मजबूत स्थानिक संस्था, लोकसहभाग आणि सामूहिक प्रयत्न यांच्या माध्यमातून गावांच्या विकासाला चालना मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अभ्यासासाठी ओडिशातील बलांगीर, मध्य प्रदेशातील मंडला, आंध्र प्रदेशातील आदोनी आणि गुजरातमधील राधनपूर या भागांमध्ये राबविण्यात आलेल्या ग्रामीण विकास उपक्रमांचा सखोल आढावा घेण्यात आला. या प्रक्रियेत २,१०० हून अधिक कुटुंबांच्या जीवनात झालेल्या बदलांचे मूल्यांकन करण्यात आले.
नवी दिल्ली येथे आयोजित चर्चासत्रात धोरण तज्ज्ञ, संशोधक आणि विकास क्षेत्रातील मान्यवरांनी आत्मनिर्भर गावांच्या निर्मितीवर विचारमंथन केले.
यांनी ग्रामीण विकासासाठी स्थानिक गरजांनुसार नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर यांनी गावांतील लोकांनी एकत्र येऊन उपाययोजना तयार केल्यास आणि स्थानिक संस्था सक्षम झाल्यासच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर गावे उभी राहू शकतात, असे मत व्यक्त केले.
तसेच यांनी आकडेवारी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लोकसहभाग यांच्या मदतीने ग्रामपंचायती अधिक सक्षम करता येऊ शकतात, असे सांगितले.
चर्चासत्रात महिला व युवकांचा सहभाग, पर्यावरण संवर्धन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर या मुद्द्यांवरही विशेष भर देण्यात आला.
रिलायन्स फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, संस्था शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून आतापर्यंत देशभरातील ९.७ कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे.

Comments
Post a Comment