जिओचा सर्वात जास्त परवडणारा ₹123 प्लॅन आता सर्व 4G फीचर फोनसाठी उपलब्ध

 जिओचा सर्वात जास्त परवडणारा  ₹123 प्लॅन आता सर्व 4G फीचर फोनसाठी उपलब्ध



केवळ ₹123 मध्ये 14GB डेटा, अमर्याद कॉलिंग आणि 300 SMS

• जिओभारतसह इतर सर्व प्रमुख 4G फीचर फोन ब्रँड्ससाठी उपलब्ध

• ग्राहकांची  वर्षाला सुमारे ₹1,000 पर्यंत बचत 

कोल्हापूर ०३ सिटी न्यूज नेटवर्क 

देशातील 4G फीचर फोन वापरकर्त्यांसाठी जिओने आणखी एक परवडणारा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीचा ₹123 चा प्रीपेड प्लॅन आता सर्व 4G फीचर फोनवर उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 14GB डेटा, अमर्याद व्हॉइस कॉलिंग आणि 300 SMSचा लाभ मिळणार आहे.



हा प्लॅन जिओभारत, नोकिया, लावा, HMD, आयटेल आणि कार्बन यांसारख्या विविध 4G फीचर फोन ब्रँड्सच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे अधिकाधिक फीचर फोन ग्राहकांना परवडणाऱ्या दरात डिजिटल कनेक्टिव्हिटीचा लाभ घेता येणार आहे.


कंपनीच्या मते, स्पर्धकांच्या सुमारे ₹199 प्रति महिना दराच्या प्लॅनच्या तुलनेत ग्राहकांना वर्षाला जवळपास ₹1,000 पर्यंत बचत होऊ शकते.


जिओचा हा नवीन ₹123 प्लॅन देशातील फीचर फोन वापरकर्त्यांना स्वस्त दरात डेटा आणि कॉलिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Comments