मनसे संस्थापक राज ठाकरे यांचा 58 वा वाढदिवस कोल्हापुरात विधायक उपक्रमांनी साजरा

 

मनसे संस्थापक राज ठाकरे यांचा 58 वा वाढदिवस कोल्हापुरात विधायक उपक्रमांनी साजरा



कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त मनसे कोल्हापूर शहर जिल्ह्याच्या वतीने विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पहाटेच्या मंगलमय वातावरणात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर येथे राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी विशेष अभिषेक करण्यात आला. यानंतर वाढदिवसानिमित्त 580 वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ आनंदराव दिंडोर्ले सांस्कृतिक भवन, साने गुरुजी वसाहत येथून करण्यात आला.

त्यानंतर भाऊजी टॉकीज परिसरातील प्रशांत पेट्रोल पंप तसेच साळुंखे नगर येथील कोंडूस्कर ऑटो सेंटर पेट्रोल पंप येथे नागरिकांसाठी दिवसभर प्रति लिटर 5 रुपये सवलतीच्या दरात पेट्रोल उपलब्ध करून देण्याच्या विशेष उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, विजय करजगार, अभिजीत पाटील, संजय चौगले, निलेश आजगावकर, निलेश धुम्मा, अभिजित राऊत, सागर साळोखे, अरविंद कांबळे, राजन हुल्लोळी, उत्तम वंदुरे, रणजित वरेकर, महेश पाटील, सुनील तुपे, मोहसिन मुल्लानी, अजिंक्य शिंदे, दिलीप पाटील, राहुल खाडे, गणेश शिंदे, विशाल कांबळे, अमित साळुंखे, अनिकेत निकम, रत्नदीप चोपडे, आदित्य सुतार, दीपक पाटील, यतीन होरणे यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक, पर्यावरणपूरक आणि जनहिताच्या उपक्रमांमुळे हा वाढदिवस कोल्हापुरात उत्साहपूर्ण आणि विधायक वातावरणात साजरा झाला.

Comments