आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 सोमवार, १ जून २०२६





अधिक ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा / दुपारी ४.३८ नंतर द्वितीया. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


🌙 चंद्र नक्षत्र - ज्येष्ठ / संध्याकाळी ७.०९ नंतर मूळ.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक / संध्याकाळी ७.०९ नंतर धनु. (नक्षत्र गंडांत शांती)



✨ आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे.


मेष:- आज दिवसाच्या पूर्वार्धात काही अडथळे जाणवतील. संध्याकाळनंतर परिस्थिती अनुकूल होईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना यशस्वी होतील.


वृषभ:- कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. कामाच्या ठिकाणी संयमाने वागणे आवश्यक आहे. संध्याकाळनंतर लाभदायक बातमी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या.


मिथुन:- चंद्र-बुध योगामुळे विचारांची गती वाढेल. लेखन, शिक्षण आणि व्यापार क्षेत्रात यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. संध्याकाळनंतर मन प्रसन्न राहील.


कर्क:- आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्या. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. मालमत्तेसंबंधी कामे पुढे सरकतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.


सिंह:- पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळनंतर शुभ कार्यासाठी वेळ अनुकूल आहे.


कन्या:- खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळनंतर आर्थिक लाभाची संधी मिळेल.


तुळ:- मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींचा सहवास लाभदायक राहील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.


वृश्चिक:- चंद्र राशीत असल्याने संवेदनशीलता वाढेल. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. संध्याकाळनंतर भाग्याची साथ मिळेल.


धनु:- संध्याकाळनंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला काळ आहे. प्रवास लाभदायक ठरेल.


मकर:- शत्रूंवर मात कराल. कोर्ट-कचेरीच्या कामात अनुकूलता राहील. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. गुप्त लाभ संभवतात. आरोग्याबाबत जागरूक राहा.


कुंभ:- भाग्योदयाचे संकेत मिळतील. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षार्थींना यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.


मीन:- उद्योग-व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संततीसंबंधी शुभ वार्ता मिळू शकते. संध्याकाळनंतर विशेष लाभ संभवतात.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

मा राजू उर्फ सुनील माने वाढदिवस विशेष


Comments