महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन कोल्हापूर बस स्थानकावर उत्साहात साजरा
कोल्हापूर, १ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर बस स्थानक येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, प्रवासी, संघटना प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त बस स्थानक परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली तसेच विशेष सजविलेल्या एस.टी. बससमोर विभाग नियंत्रक मा. श्री. अभयजी देशमुख यांच्या हस्ते व उपस्थित प्रवाशांच्या सहभागातून केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी सन २०२५-२६ मधील दहावी व बारावी परीक्षेत मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे व पदके देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर बस स्थानक येथे सी.पी.आर. रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
कार्यक्रमास कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक मा. श्री. अभयजी देशमुख, विभागीय वाहतूक अधिकारी मा. श्री. अनिलजी मेहता, आगार व्यवस्थापक कोल्हापूर मा. श्री. प्रमोद तेलवेकर, मा. श्री. गणेश कोळी, स्थानक प्रमुख मा. श्री. मल्लेश विभुते, कार्यशाळा प्रमुख मा. श्री. विजय निगडे, एन.आय.टी.चे प्राध्यापक मा. श्री. संग्रामसिंह पाटील,सनातन प्रभातचे श्री. अजय केळकर तसेच सी.पी.आर.चे डॉ. रोहित आर्वीकर, दत्तात्रय एवढे, सौ. सुप्रियांका, श्वेता, गजानन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याशिवाय कोल्हापूर आगारातील सर्व पर्यवेक्षक, कर्मचारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Comments
Post a Comment