आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 बुधवार, ३ जून २०२६






अधिक ज्येष्ठ कृष्ण तृतीया / रात्री ९.२२ नंतर चतुर्थी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे."


🌙 नक्षत्र - पूर्वाषाढा.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु. (सकाळी ८.१३ ते रात्री ९.२२ विष्टी करण)


🙏 संकष्टी चतुर्थी चंद्रोदय मुंबई - रात्री ९.५१. नाशिक - ९.४९.


🔭 रवी षडाष्टक चंद्र.

🔭 चंद्र प्रतियुती शुक्र.

🔭 चंद्र केंद्र शनी.

🔭 बुध केंद्र नेपच्यून.


टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाच्या सुरुवातीला कामे सुरळीत पार पडतील. नंतर भावनिक निर्णय टाळा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा. आध्यात्मिक विषयात रुची वाढेल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. रवी-चंद्राच्या अशुभ संबंधामुळे अहंकार टाळावा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. संध्याकाळनंतर मन शांत राहील.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) बुध-नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती वाढेल. लेखन, शिक्षण आणि कलाक्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करूनच निर्णय घ्या. आर्थिक लाभ संभवतात.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) घरगुती वातावरण चांगले राहील. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मातृसुख लाभेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. संवाद कौशल्यामुळे कामात यश मिळेल.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) आर्थिक बाबतीत दिवस संमिश्र आहे. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबीयांच्या सल्ल्याचा लाभ होईल. चंद्र-शुक्र प्रतियुतीमुळे भावनिक खर्च वाढू शकतो. संयमाने निर्णय घ्या.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) राशीपासून तृतीयस्थानी ग्रहप्रभाव अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. प्रेमसंबंधात काही सकारात्मक घडामोडी होतील. नवीन योजना यशस्वी होतील.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या. ध्यान-प्रार्थनेतून मानसिक शांती लाभेल.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) राशीस्थानी चंद्र असल्याने उत्साह वाढेल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. समाजात प्रतिष्ठा वाढेल.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) व्ययस्थानी चंद्र असल्याने काही कामे अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होतील. खर्च वाढू शकतो. संयमाने वागा. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यातून समाधान मिळेल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) लाभस्थानी ग्रहयोग असल्याने आर्थिक आवक वाढेल. मित्रमंडळींचा सहवास लाभदायक राहील. नवीन करार आणि व्यवहार यशस्वी होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून लाभही होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments