आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

सोमवार, ८ जून २०२६.




अधिक ज्येष्ठ कृष्ण अष्टमी. ग्रीष्म ऋतू.

पराभवनाम संवत्सर, शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

(संपर्क - 8087520521)


⏰ राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


🌙 चंद्र नक्षत्र व राशी

नक्षत्र - शततारका / (सकाळी ९.१० नंतर) पूर्वाभाद्रपदा

राशी - कुंभ


🌟 आजचा दिवस

"आज चांगला दिवस आहे."


🔭 ग्रहयोग

रवी केंद्र चंद्र

चंद्र लाभ मंगळ

चंद्र त्रिकोण शुक्र


📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष :-

उत्साहवर्धक दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन योजना यशस्वी होतील. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील.


🐂 वृषभ :-

कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. संयमाने वागल्यास सर्व कामे सुरळीत पार पडतील.


👬 मिथुन :-

भाग्याची साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण, लेखन आणि बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.


🦀 कर्क :-

संमिश्र दिवस आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. आरोग्याकडे लक्ष द्या. गुप्त लाभाची शक्यता आहे. मानसिक शांततेसाठी ध्यान उपयुक्त ठरेल.


🦁 सिंह :-

वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.


👧 कन्या :-

कामाचा ताण वाढू शकतो. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नियमितपणा लाभदायक ठरेल.


⚖️ तुळ :-

संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात यश लाभेल. कला आणि सर्जनशील क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


🦂 वृश्चिक :-

घरगुती वातावरण आनंददायक राहील. मालमत्तेसंबंधी निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल.


🏹 धनु :-

पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवाद कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. लहान प्रवासाचे योग संभवतात. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.


🐐 मकर :-

आर्थिक लाभाचा दिवस आहे. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. नवीन खरेदीचा योग संभवतो.


🏺 कुंभ :-

चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. रवी-चंद्र आणि मंगळाच्या शुभ प्रभावामुळे धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. नवीन योजना राबविण्यासाठी योग्य वेळ आहे. समाजात मान-सन्मान वाढेल.


🐟 मीन :-

खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. काही जुन्या गोष्टींचा विचार मनात येईल. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक जाईल.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 8087520521

Comments