आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 बुधवार, १० जून २०२६





अधिक ज्येष्ठ कृष्ण दशमी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे."


🌙 नक्षत्र - उत्तराभाद्रपदा / सकाळी ९.२२ नंतर रेवती.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन. (दुपारी १.५३ नंतर विष्टी करण)


🔭 रवी लाभ चंद्र.

🔭 चंद्र केंद्र बुध.

🔭 चंद्र युती शनी.

🔭 बुध केंद्र शनी.


टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभदायक घडामोडी घडतील. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहारात यश मिळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो. संयम ठेवा.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नवीन संधींचा लाभ घ्या. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्याची काळजी घ्या.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण, लेखन आणि बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा. अनपेक्षित खर्च वाढू शकतात. संशोधनात्मक कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्या.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) भागीदारीच्या कामात लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. शत्रूपक्षावर विजय मिळवाल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सर्जनशील कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. संततीकडून आनंदवार्ता मिळू शकते.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) घरगुती विषयांना प्राधान्य द्यावे लागेल. मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक समाधान लाभेल.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. लहान प्रवास फायदेशीर ठरतील. भावंडांचे सहकार्य मिळेल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबातील व्यक्तींशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. गुंतवणुकीसाठी दिवस मध्यम आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) चंद्र राशीपासून द्वितीयस्थानी असल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. निर्णयक्षमता चांगली राहील.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) राशीस्थानी चंद्र आणि शनी युतीमुळे जबाबदाऱ्या वाढतील. संयम आणि चिकाटीने कामे पूर्ण कराल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. आध्यात्मिक विषयांत रुची वाढेल.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments