आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

🌞 गुरुवार, ११ जून २०२६


🌞 गुरुवार, ११ जून २०२६

अधिक ज्येष्ठ कृष्ण एकादशी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


✨ "सकाळी ८.१७ नंतर नवीन कामांना गती मिळेल."


🌙 नक्षत्र - रेवती / सकाळी ८.१७ नंतर अश्विनी.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन / सकाळी ८.१७ नंतर मेष.  (नक्षत्र गंडांत)



🙏 आज कमला एकादशी.


🔭 चंद्र केंद्र गुरू.

🔭 चंद्र केंद्र शुक्र.


टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सकाळनंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. एकादशीचे व्रत व उपासना मानसिक समाधान देईल. महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) लाभस्थानी ग्रहप्रभाव अनुकूल असल्याने आर्थिक आवक वाढेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना यशस्वी होतील. सामाजिक संपर्कातून फायदा होईल.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील, परंतु त्यातून लाभही मिळेल. प्रतिष्ठा वाढवणाऱ्या घटना घडू शकतात.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च संभवतो. संशोधन, विमा किंवा वारसाहक्काशी संबंधित विषयात प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भागीदारीच्या कामात लाभ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. चंद्र-गुरू आणि चंद्र-शुक्र संबंधामुळे संबंधांमध्ये गोडवा वाढेल. नवीन करार फायदेशीर ठरतील.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीचे फळ मिळेल. विरोधकांवर विजय मिळवाल. आरोग्यविषयक बाबींमध्ये दक्षता घ्या. नियमित दिनचर्येचा लाभ होईल.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सर्जनशील कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस लाभदायक आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील. संततीकडून आनंददायी बातमी मिळू शकते.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्ता, वाहन किंवा वास्तूसंबंधी कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. लहान प्रवास लाभदायक ठरतील. संवाद कौशल्यामुळे कामात यश मिळेल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) सकाळपर्यंत चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे सकाळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर खर्च आणि धावपळ वाढू शकते. आध्यात्मिक साधनेतून मनःशांती लाभेल.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.






Comments