डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ (वॉशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकन
कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळाचे (एनबीए) प्रतिष्ठेचे टीएर-१ (वॉशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकन प्राप्त झाले आहे. ही माहिती डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी दिली.
हॉटेल सयाजी येथे आयोजित विशेष समारंभात या मानांकनाची घोषणा करण्यात आली. यावेळी यावेळी डॉ. गणेश पाटील, सिव्हील विभागप्रमुख किरण माने, केमिकल विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव, कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख डॉ. राधिका ढणाल, इलेक्ट्रोनिक्स अड टेलीकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. टी. बी. मोहिते पाटील, पोलीटेक्निक्चे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त केले. आणि यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयातील केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पाच अभ्यासक्रमांना हे मानांकन मिळाले आहे. शैक्षणिक गुणवत्ता, परिणामाधारित शिक्षण, संशोधन, उद्योग-संलग्नता, प्रयोगशाळा सुविधा आणि विद्यार्थ्यांची प्रगती यांचे सखोल मूल्यमापन केल्यानंतर हे मानांकन प्रदान करण्यात आले.
डॉ. संजय पाटील यांनी सांगितले की, हे मानांकन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मिळालेली जागतिक दर्जाची गुणवत्ता-पावती असून भविष्यातही जागतिक दर्जाचे अभियंते घडविण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील. संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे हे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऋतुराज पाटील म्हणाले की, या मानांकनामुळे विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. उद्योग, संशोधन आणि नवोपक्रम यांचा संगम घडवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले की, भारत वॉशिंग्टन ॲकॉर्डचा सदस्य असल्याने या अभ्यासक्रमांना २६ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षण, जागतिक रोजगार संधी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी मोठा लाभ होईल. तसेच या मानांकनामुळे पश्चिम भारतातील मोजक्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश झाला आहे.
प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी हे मानांकन संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि परिणामाधारित शिक्षण व्यवस्थेवरील राष्ट्रीय विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले.
मानांकनाचे प्रमुख फायदे
- अभियांत्रिकी पदवीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
- परदेशातील उच्च शिक्षण व रोजगारासाठी वाढीव संधी
- जागतिक दर्जाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री
- आंतरराष्ट्रीय व्यावसायिक गतिशीलतेस चालना
- उद्योगाभिमुख व परिणामाधारित शिक्षणाला बळ
- विद्यार्थ्यांच्या जागतिक स्पर्धात्मकतेत वाढ

Comments
Post a Comment