रिपाइंचे सहकार आघाडी प्रभारी सलीम सय्यद ७ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर

 रिपाइंचे सहकार आघाडी प्रभारी सलीम सय्यद ७ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर




कोल्हापूर ०३ सिटी न्यूज नेटवर्क 

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) सहकार आघाडीचे महाराष्ट्र व नॉर्थ ईस्ट भारताचे प्रभारी सलीम सय्यद हे रविवार, ७ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून वंचित, उपेक्षित आणि अनुसूचित समाजघटकांच्या उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.



सलीम सय्यद यांनी केंद्र शासनाच्या सहकार विभागाशी संबंधित विविध योजनांमध्ये भरीव काम केले आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच नॉर्थ ईस्ट भागातील तळागाळातील समाजघटकांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात ते कोल्हापूरमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.


सहकाराच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगार, बचत गटांचे बळकटीकरण आणि उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही ते मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले.


याबाबतची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते प्रा. शहाजी कांबळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, सलीम सय्यद यांच्या दौऱ्यामुळे सहकार क्षेत्रात नवीन संधी निर्माण होऊन वंचित समाजघटकांच्या विकासाला चालना मिळेल.

Comments