आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 बुधवार, १७ जून २०२६




निज ज्येष्ठ शुक्ल तृतीया. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८३.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज शुभ दिवस आहे."


🌙 नक्षत्र - पुनर्वसू / दुपारी १.३७ नंतर पुष्य.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन / सकाळी ८.१३ नंतर कर्क. (रात्री ८.५१ पर्यंत ध्रुव योग)


🔭 चंद्र युती गुरू.

🔭 चंद्र युती शुक्र.

🔭 चंद्र लाभ हर्षल.

🔭 चंद्र त्रिकोण नेपच्यून.

🔭 शुक्र त्रिकोण नेपच्यून.


टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. प्रलंबित कामे मार्गी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) सकाळी राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना राबविण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. प्रवासाचे योग संभवतात.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) सकाळनंतर चंद्र राशीत येत असल्याने उत्साह वाढेल. कौटुंबिक विषयांत सकारात्मक घडामोडी घडतील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळतील. मित्रपरिवारातून लाभदायक संपर्क वाढतील. नवीन संधींचा योग्य लाभ घ्या. महत्त्वाच्या निर्णयात संयम ठेवा.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण यशही मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नियोजनबद्ध काम केल्यास अपेक्षित प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भाग्याची उत्तम साथ मिळेल. शिक्षण, कला आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवास लाभदायक ठरेल.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. गुप्त किंवा संशोधनात्मक कामात प्रगती होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. अनावश्यक वाद टाळावेत.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भागीदारीच्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नवीन करार किंवा व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. शत्रूपक्षावर मात कराल. कामातील अडचणी दूर होतील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) विद्यार्थ्यांसाठी दिवस विशेष अनुकूल आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील. संततीकडून आनंदवार्ता मिळू शकते. सर्जनशील कार्यात यश मिळेल.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) घरगुती विषयांना प्राधान्य द्यावे लागेल. मालमत्ता किंवा वाहनासंबंधी कामे मार्गी लागू शकतात. आईच्या सहकार्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments