आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

🌞 शनिवार, २० जून २०२६




निज ज्येष्ठ शुक्ल षष्ठी / दुपारी ३.४७ नंतर सप्तमी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


✅ आजचा दिवस शुभ आणि उत्साहवर्धक आहे.


🌙 नक्षत्र - मघा / सकाळी ९.२६ नंतर पूर्वा (फाल्गुना).

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. (दुपारी १२.४८ पर्यंत वज्र योग)


२० जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर चंद्र, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा भाग्योदय पाणथळ जागेजवळ होतो. विवाहानंतर अधिक प्रगती होते. मित्रपरिवार मोठा असतो. लेखनाची आवड  असते. वक्तृत्व उत्तम असते. बोलण्याने छाप पडते. भाषण देण्यात यशस्वी होतात. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये अधिक लोकप्रिय असतात. तुम्ही प्रगल्भ आहात. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुमच्याकडे दिलेले काम तुम्ही प्रयत्नपूर्वक पूर्ण करतात. तुमचे स्वतंत्र विचार असले तरी इतरांचा तुम्ही सन्मान करतात. मान-मरातब, कौतुक, प्रतिष्ठा याची तुम्हाला मनातून आवड आहे. दुरबला लोकांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. तुम्ही लोकांमध्ये मिसळतात. नवनवीन गोष्टी विकत घेणे, नवीन काहीतरी करून पाहणे तसेच प्रवास यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्ही बुद्धिमान आहात आणि लोकप्रिय आहात. इतरांना तुमचा सहवास आवडतो. इतरांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले काय आणि वाईट काय याची तुम्हाला जाण आहे. तुम्ही मोठमोठाले प्रकल्प प्रत्यक्षात आणू शकतात. स्वतःच्या कामात व्यस्त असणे तुम्हाला आवडते. तुम्ही नम्र आहात. आणि कायदा प्रेमी आहात. तुमच्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात.



व्यवसाय:-  लेखक, वक्ता, राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, अकाउंट्स, मॉल, चार्टर्ड अकाउंटंट.


शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा, निळा, जांभळा, पिवळा.


शुभ रत्न:- मोती, हिरा.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


🔭 चंद्र राशीत.

🔭 चंद्र शुभ प्रभावी.

🔭 सूर्य-चंद्र अनुकूल स्थितीत.

🔭 ग्रहमान प्रगतीकारक.


टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होईल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) संवाद कौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवास फायदेशीर ठरतील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. मौल्यवान वस्तू खरेदीचा योग आहे.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) चंद्र राशीत असल्याने व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. नवीन संधींचा लाभ घ्यावा.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात मन रमणार आहे. परदेश किंवा दूरच्या ठिकाणाहून शुभवार्ता मिळू शकते.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. लाभस्थानी ग्रहमान असल्याने आर्थिक फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन संपर्क उपयोगी ठरतील.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च संभवतो. संयम आणि योग्य नियोजनामुळे अडचणी दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) भागीदारीच्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. नवीन करार आणि व्यवहार लाभदायक ठरतील. सहकार्य वाढेल.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) कामाचा व्याप वाढेल, परंतु त्यातून चांगला लाभ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांवर मात कराल. नियमित कामातून समाधान मिळेल.


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments