लव्ह जिहाद’ हा केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित नसून कॉर्पोरेट क्षेत्रातही त्याचे जाळे - सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
लव्ह जिहाद’ हा केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित नसून कॉर्पोरेट क्षेत्रातही त्याचे जाळे - सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’अभियानात सहभागी व्हा
कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क
‘लव्ह जिहाद’चे संकट आता केवळ ठराविक वस्त्या किंवा ग्रामीण भागापुरते मर्यादित राहिलेले नसून, ते उच्चभ्रू समजल्या जाणार्या कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. नाशिकमधील ’टीसीएस’ कंपनी, मुंबईतील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आणि पुण्याच्या ‘विप्रो’ कंपनीत अलीकडच्या काळात उघडकीस आलेल्या घटना हे याचेच स्पष्ट संकेत आहेत. हा प्रकार केवळ हिंदु मुलींवर नव्हे, तर थेट हिंदु धर्मावर घातलेला घाला आहे. या भयावह संकटाचा सामना करण्यासाठी हिंदु युवती आणि महिलांनी धर्माचरण व संस्कृतीचे निष्ठेने पालन करणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी येथे केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 7 जून रोजी ‘पद्माराजे गर्ल्स हायस्कूल’च्या (पेटाळा) राम गणेश गडकरी सभागृहात ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि त्यांवरील उपाययोजना’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या मुख्य वक्त्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित करत यामागील ऐतिहासिक आणि जागतिक षडयंत्रावर प्रकाश टाकला. या व्याख्यानाला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि महिला-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनात सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘साम्यवादी इकोसिस्टीमकडून हिंदु संस्कृती आणि परंपरेविषयी जाणीवपूर्वक चुकीचे नॅरेटिव्ह पसरवले जात आहे. प्रत्यक्षात या प्रचारात तिळमात्रही तथ्य नाही. हिंदु समाजाने आणि विशेषतः महिलांनी आपल्या वीरांगनांचा आदर्श समोर ठेवण्याची गरज आहे, ज्यांनी धर्मरक्षणासाठी अभिमानाने जोहार स्वीकारला. आज प्रत्येक हिंदु कुटुंबात धर्माभिमान जोपासला गेला, तर देशातील एकही मुलगी या जाळ्यात अडकणार नाही.’’
‘लव्ह जिहाद’ हे हिंदु संस्कृती, हिंदु धर्म संपवण्याचे मोठे षडयंत्र ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*
कार्यक्रमाचे दुसरे मुख्य वक्ते श्री. रमेश शिंदे यांनी आपल्या भाषणात ’लव्ह जिहाद’चा ऐतिहासिक संदर्भ मांडला. वर्ष 711 मध्ये महंमद बिन कासीमच्या आक्रमणापासून ते गझनी, घोरी, बाबर यांच्या काळातील अत्याचारांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातच महिलांना वास्तविक सन्मान आणि सुरक्षा मिळाली. त्यानंतर 1947 च्या वेळी झालेली देशाची फाळणी, वर्ष 1971 मध्ये झालेली बांगलादेशची निर्मिती, 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला हिंदूंचा नरसंहार, वर्ष 1992 मध्ये ‘अजमेर सेक्स स्कँडल’सारखी मोठी घटना घडली ज्यात 250 पेक्षा अधिक हिंदू युवती बळी पडल्या आहेत. हिंदु महिला आणि युवती यांच्यावर झालेले अत्याचार तेव्हापासून आतापर्यंत चालूच आहेत. ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु संस्कृती, हिंदु धर्म संपवण्याचे मोठे षडयंत्र आहे.
श्री. शिंदे यांनी पुढे इशारा दिला की, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ सारख्या संघटनांचे वर्ष 2047 पर्यंत भारतात ’दार-उल-इस्लाम’ म्हणजेच स्वतःचे शासन आणण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ‘गझवा-ए-हिंद’च्या माध्यमातून लोकसंख्या वाढवणे आणि हिंदूंची वंशावळ संपवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. चित्रपटसृष्टीतील उदाहरणांवरूनही समाजाने आता तरी जागृत होण्याची वेळ आली आहे.
‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियान
या गंभीर संकटाचा प्रतिकार करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण देशात ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ हे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. यात सर्वांन सहभागी व्हावे. हिंदु युवतींनी या अभियानाचे सक्रिय सदस्य होऊन स्वतःचे आणि राष्ट्राचे रक्षण करावे, असे आवाहन श्री. रमेश शिंदे यांनी केले.



Comments
Post a Comment