अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीची एकहाती सत्ता; समर्थ पॅनलचा दणदणीत विजय
कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क
या निवडणुकीत समर्थ पॅनलच्या उमेदवारांना सभासदांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध पदांसाठीच्या सर्व जागांवर समर्थ पॅनलचे उमेदवार विजयी झाले. या विजयामुळे चित्रपट महामंडळाच्या कारभारावरील सत्तारूढ आघाडीची पकड अधिक मजबूत झाली आहे.
विजयानंतर समर्थ पॅनलच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि घोषणाबाजी करत त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी अध्यक्ष मेघराज भोसले यांनी सर्व सभासदांचे आभार मानत हा विजय चित्रपट क्षेत्रातील सर्व घटकांचा असल्याचे सांगितले.
"महामंडळाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते व इतर घटकांच्या हितासाठी अधिक जोमाने काम करण्यात येईल. सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे मेघराज भोसले यांनी विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले.
या निकालामुळे आगामी काळात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या धोरणांवर आणि विकासात्मक उपक्रमांवर समर्थ पॅनलचा प्रभाव अधिक वाढणार असल्याचे चित्रपट क्षेत्रात बोलले जात आहे.

Comments
Post a Comment