अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड

 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड



कोल्हापूर, दि. १५ सिटी न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड आज सर्वानुमते पार पडली. संस्थेच्या विविध पदांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सर्व पदाधिकारी एकमताने निवडून आले.

यामध्ये मेघराज भोसले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड झाली. खजिनदारपदी सुनील महाजन, सहखजिनदारपदी शरद चव्हाण, तसेच कार्यवाहपदी सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली. सहकार्यवाह वासू पाटील पदासाठीही सर्वानुमते निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

निवडीनंतर नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आणि महामंडळाच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या निवड प्रक्रियेसाठी रागिणी खडके यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतरीत्या पूर्ण झाली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी महामंडळाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments