ग्राहक संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी किशोर घाटगे यांची निवड


ग्राहक संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी किशोर घाटगे यांची निवड



कोल्हापूर ११ सिटी न्यूज नेटवर्क 

सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे कोल्हापूर येथील  किशोर जयवंतराव घाटगे यांची ग्राहक संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी प्रदान केले.



भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे नोंदणीकृत असलेल्या मानवता सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या माध्यमातून ग्राहक हक्क संरक्षण, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. केंद्र व राज्य शासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने ही समिती कार्यरत आहे.

समितीमध्ये राज्यातील नामांकित निवृत्त न्यायाधीश, डॉक्टर, वकील तसेच ग्राहक संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर असून उपभोक्ता संरक्षण कल्याण अधिनियम १९८६ व २०१९ अंतर्गत ग्राहक संरक्षण क्षेत्रातील विशेष अभ्यास, कायद्याचे ज्ञान, सामाजिक बांधिलकी आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन श्री. घाटगे यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या समितीच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, कायदेशीर मार्गदर्शन आणि जनजागृतीचे कार्य करण्यात येणार आहे. श्री. किशोर घाटगे यांच्या या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments