कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेतर्फे १,२०१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 


कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेतर्फे १,२०१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप



कोल्हापूर, दि. १२ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेच्या वतीने गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित शैक्षणिक मदत वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकूण १,२०१ विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, कंपास बॉक्स तसेच शालेय बॅग यांसह विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात मा. पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे व समाजाचे उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. विजय कागले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मा. अमर क्षीरसागर यांनी संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत उपस्थितांना संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. संस्थेचे अध्यक्ष मा. विवेक शेटे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, गेल्या १०३ वर्षांपासून संस्था गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अनिकेत नाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण तपकिरे यांनी केले.

यावेळी वैभव सावर्डेकर, सुरेश लिंबेकर, राजेंद्र लकडे, श्रीनिवास मिठारी, संजीव परीख, धन्यकुमार चव्हाण, विवेक नष्ठे, किशोर तांदळे, अभयकुमार अथने, संतोष लाड, सहाय्यक अशोक वडणगेकर, ऋषीकेश मर्दाने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, संस्थेचे सभासद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक मदतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याचा संस्थेचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments