स्वयंसिद्धा व डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार सोहळा १५ जूनला

 स्वयंसिद्धा व डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार सोहळा १५ जूनला



कोल्हापूर ११ सिटी न्यूज नेटवर्क 

सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या गौरवासाठी स्वयंसिद्धाचा ३४ वा आणि डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनचा ३२ वा वर्धापनदिन सोहळा सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६ व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या वतीने आठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.



यावर्षीच्या प्रमुख पुरस्कारांमध्ये स्व. कांचनताई परुळेकर स्मृती गौरव पुरस्कार २०२६ हा एक लाख रुपये व मानपत्रासह प्रदान करण्यात येणार असून, हा पुरस्कार डॉ. सुधा कोठारी (चैतन्य, राजगुरुनगर) यांना जाहीर करण्यात आला आहे.


तसेच डॉ. शोभना तावडे मेहता ‘आरोग्यम धनसंपदा’ पुरस्कार डॉ. श्रीकांत मोहनराव शिंदे यांना, कै. जिनेंद्र शिरोळकर स्मरणार्थ गुरुवर्य पुरस्कार लखन दिलीप जाधव यांना, कै. राजीव हुजूरबाजार स्मरणार्थ जीवन सारथी पुरस्कार मारुती दौलत रांबाडे यांना आणि कै. कु. विभावरी आपटे पुरस्कार उज्वला शिवाजी चव्हाण यांना प्रदान करण्यात येणार आहे.


महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या कै. सौ. माणिकताई जामसंडेकर महिला सबलीकरण प्रकल्प ‘माणिकमोती’ अर्थसहाय्य अंतर्गत आटा चक्की प्रकल्पासाठी अर्चना गिरीश करगुप्पीकर यांची निवड करण्यात आली आहे.


पत्रकार परिषदेला सौम्या तिरोडकर (अध्यक्ष, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन), जयश्री गायकवाड (कार्यकारी संचालिका, स्वयंसिद्धा), तृप्ती पुरेकर, विश्वास पाटील, अनिलराज जगदाळे, पूजा नोतानी, जागृती लिगाडे, अंजली घोरपडे, वैशाली चौगुले, मीना ठक्कर, नीता दटमजगे, सुजाता नाईक, कविता बड्डे आणि प्रीती साळोखे उपस्थित होत्या.


स्वयंसिद्धा आणि डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन गेली अनेक वर्षे महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय आणि आर्थिक स्वावलंबनाच्या क्षेत्रात कार्यरत असून, वर्धापनदिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा हा समाजातील प्रेरणादायी कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करणारा ठरणार आहे.

Comments