कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मागणीसाठी निवेदन सादर

 

कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मागणीसाठी निवेदन सादर

 नायब तहसीलदार नम्रता चौगुले-शिराणे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ते सुनील ऊर्फ राजू माने आणि इतर


कोल्हापूर, दि. २ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (केएमआरडीए) स्थापन करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज (दि. २ जून) माननीय नायब तहसीलदार तथा गृह जनमाहिती अधिकारी नम्रता संजय चौगुले-शिराणे यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनाद्वारे कोल्हापूर शहर व परिसराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी स्वतंत्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी, तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध विकासात्मक मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते एस. राजू माने, प्रशांत मंडलिक, दत्तात्रय माने, रुपेश घडशी, प्रकाश टोपकर, प्रदीप दुगाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, नियोजनबद्ध शहरी विस्तार आणि विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.


Comments