अधिक मासानिमित्त धार्मिक कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



अधिक मासानिमित्त धार्मिक कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




कोल्हापूर, दि. १४ सिटी न्यूज नेटवर्क 

 अधिक मासानिमित्त मंगळवार पेठ येथील स्वामीभक्त प्रसाद जाधव व परिवाराच्या वतीने चौंडेश्वरी हॉल येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास सुमारे ५०० हून अधिक महिला व भाविक उपस्थित होते.


अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असून त्याला पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सारामृत पारायण, विष्णुसहस्त्रनाम पठण, कुंकुमार्चन तसेच नामस्मरण आदी उपक्रम पार पडले. यावेळी वैयक्तिक, सामाजिक हित व समाजातील शांततेसाठी विशेष प्रार्थना आणि संकल्प करण्यात आला.


कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांनी धार्मिक वातावरणाचा आनंद घेतला तसेच अशा आध्यात्मिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.


यावेळी प्रसाद जाधव, माधुरी काटकर, यशस्विनी जाधव, मुकुंद काटकर, आर्यनिल जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुबंधू उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.



Comments