पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
शहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागाची संयुक्तिक बैठक
कोल्हापूर दि.१७ सिटी न्यूज नेटवर्क
शहरात पाणी पुरवठ्याच्या परिस्थिती अंत्यत गंभीर बनत चालली आहे. पावसाळ्यास झालेला विलंब ही नैसर्गिक आपत्ती असली तरीही शहरवासियांना मुबलक पाणी पुरविणे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. यात अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
शहरातील पाणीबाणीच्या स्थितीबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने महापालिका आणि जलसंपदा विभागाची संयुक्तिक बैठक आज आयुक्त कार्यालयात पार पडली. बैठकीच्या सुरवातील महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी पाणीपुरवठ्या संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, २०१६ नंतर प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून लांबणीवर पडल्याने धरणातील पाणी साठा कमी झाला आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले नव्हते. याबाबत पाठबंधारे विभागास आवश्यक सूचना दिल्या असल्याने सद्यस्थितीत धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, उद्या सकाळ पर्यंत शहरवासियांना सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरु होईल, अशी आशा व्यक्त केली.
या बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जलअभियंता हर्षजीत घाटगे, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता श्री.पाखवे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, शिवसेनेचे कमलाकर जगदाळे, आश्पाक आजरेकर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment