खाशाबा जाधव पुरस्कार ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना जाहिर

खाशाबा जाधव पुरस्कार ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना जाहिर

ऑलिम्पिकपटू बंडा पाटील 


लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम 


कोल्‍हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क 

 पुण्यातील ध्रुवतारा फाऊंडेशनकडून दिला जाणारा मानाचा चौथा खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना गौरव करण्यात येणार आहे. कोल्‍हापूरात ऑलिम्‍पिक दिनानिमित्त मंगळवार २३ जून रोजी हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खाशाबा जाधव पुस्‍तकाचे लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम कोल्‍हापूर, कराडमध्ये ऑलिम्‍पिक दिनानिमित्त होत आहे. 


कोल्‍हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्‍या सभागृहात सकाळी १० वाजता ऑलिम्‍पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराने बंडा पाटील  गौरवित केले जाणार आहे. शाल, श्रीफळ, गौरव चिन्ह, रोख 5 हजार रूपये, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 


उद्योजक रोहित मुसळे, मनिष झंवर यांच्‍या हस्‍ते हा सन्‍मान केला जाणार आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शासनाचे कुस्‍तीचे क्रीडा अधिकारी अरूण पाटील, प्राचार्य गजानन खाडे यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत ऑलिम्‍पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराचा समारंभ करणार आहे. याप्रसंगी ऑलिम्‍पिकपटूंच्‍या परिवारातील शामराव जाधव व माणिक माणगावे,

राष्ट्रीय खो-खो  खेळाडू सानिका चाफे, अमृता पाटील, श्रावणी पाटील, कुस्‍तीगीर पृथ्वीराज  मोहिते, क्रीडा प्रशिक्षक भीमा भांदिगरे यांचा सत्‍कार केला जाणार असल्‍याची माहिती ध्रुवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधाणे यांनी दिली आहे. 



१९६४ च्‍या टोकिओमधील ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांनी सहभाग घेतला होता. कोल्‍हापूरातील शाहूवाडी तालुक्‍यातील रेठरे गावातील बंडा पाटील यांनी सलग ७ वेळा राज्‍य तर २ वेळा राष्ट्रीय कुस्‍ती स्‍पर्धेत पदकाचा पराक्रम केला आहे. राष्ट्रीय शालेय खो खो स्‍पर्धेत कोल्‍हापूरच्‍या सानिका चाफेने महाराष्ट्राचे नेतृत्‍व केले होते. यापूर्वी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा यांचा खाशाबा जाधव पुरस्कारान गौरव करण्यात आला आहे.



प्रसिद्ध क्रीडालेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम

ऑलिम्‍पिक दिनानिमित्त लेखक संजय दुधाणेंचे याचे कराड व कोल्‍हापूर येथे सलग ३ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणारे महान मल्ल खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यासाठी त्यांच्या चरित्राचे लेखक संजय दुधाणे यांचा विशेष संवाद कार्यक्रम सोमवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता शिवाजी पेठ, सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशालेत आयोजित करण्यात आला आहे.

कोल्‍हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलमध्ये १९५२ काळात राजाराम महाविद्यालय भरायचे. या महाविद्यालाच्‍या मुख्य सभागृहात खाशाबांचा कोल्‍हापरकरांनी नागरी सत्‍कार केला होता. आता याच ऐतिहासिक सभागृहात खाशाबा जाधव पुरस्‍कार समारंभ ऑलिम्‍पिक दिनी रंगणार आहे. यावेळी खाशाबामय असणारे संजय दुधाणे हे कोल्‍हापूरातील खाशाबांच्‍या आठवणींना उजाळा देणार आहेत.  कराडमध्येही लेखक आपल्‍या भेटीला कार्यक्रम होणार आहे.

Comments