भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेचा सीपीआर प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर ०३ सिटी न्यूज नेटवर्क
संघटनेच्या शिष्टमंडळाने आज सी पी आर चे अधिष्ठाता यांना भेटून रुग्णालयात वारसा हक्काने देण्यात आलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असून याबाबत तात्काळ स्थगिती देऊन कार्यवाही करावी अन्यथा संघटना तिव्र आंदोलन करेल अशी असा इशारा दिला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणी बाबत सुधारीत तरतुदीच्या अनुषंगाने शासन निर्णय जारी केले परंतु सदर शासन निर्णयाच्या अंमलबजावणी बाबत मा..उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे सदर निर्णय प्रलंबित होता.
सदर याचीकेवर निर्णय झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 30/7/2025 रोजी परिपत्रक काढून सदर निर्णयाची अंमलबजावणी करणे बाबत सर्व शासकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय व इतर यांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार अंमलबजावणी करण्याबाबत कळवले.
परंतु न्यायालय निर्णय झाल्यानंतर सदर निर्णयाच्या अंमलबजावणी बाबत वरिष्ठ कार्यालय कडून कोणतेही आदेश नसताना व न्यायालयाचा निर्णय होण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना घाईगडबडीत नियुक्तीपत्र देऊन चुकीच्या पद्धतीने कार्यवाही केल्याचे निदर्शनास येत आहे तरी याबाबत सखोल चौकशी करून सर्व नियुक्त्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशापूर्वी का देण्यात आले याची चौकशी करावी व सदर नियुक्ती बेकायदेशीर असल्यास रद्द करून कडक कारवाई करण्यात यावी याबाबत संघटनेने निवेदन देऊन तक्रार दाखल केली होती.
परंतु सदर तक्रार अर्जावर आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाल्याचे दिसून येत असल्यामुळे संबंधित अधिकारी दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संघटना या विरोधात दि.16/06/26 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून रुग्णालयाचे प्रवेशद्वारासमो समविचारी पक्ष व संघटना सोबत घेऊन बेमुदत जनजागृती आंदोलन करणार आहोत असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पोवार, सुनिता कांभरे, गोविंद आवळे, नेताजी कांबळे, सुरेश पोतदार,सुखदेव शेटे राजश्री पोवार ,प्रशांत माने,रत्नमाला कांबळे आधी सह पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment