साई फार्म हाऊसमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत; मान्यवरांच्या हस्ते सत्कार
कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांचा कळंबा येथील नागरिकांच्या वतीने उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.
कळंबा येथील साई फार्म हाऊस येथे आगमन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कळंबा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अरुण टोपकर, साई डेव्हलपर्सचे सुरेश दिवसे, माजी पंचायत समिती सभापती मिनाक्षी पाटील यांचे पती भगवान पाटील, राजेंद्र थोरात, विजय साळुंखे, विश्वजीत पाटील, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव कृष्णात पाटील तसेच भिकाजी गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी परिसरातील नागरिक, मराठा समाजाचे कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कळंबा परिसरातील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्याप्रती आपला आदर व समर्थन व्यक्त केले.
.jpg)
Comments
Post a Comment