फक्त ₹55 मध्ये 1000 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचा आनंद; जिओने सादर केला नवा जिओटीव्ही प्रो पॅक

 फक्त ₹55 मध्ये 1000 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचा आनंद; जिओने सादर केला नवा जिओटीव्ही प्रो पॅक 


कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी अत्यंत परवडणारा नवा मनोरंजन प्लॅन सादर केला आहे. कंपनीने केवळ ₹55 मध्ये जिओटीव्ही प्रो पॅक लॉन्च केला असून, त्याची वैधता 30 दिवसांची असेल. या पॅकद्वारे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर JioTV अॅपच्या माध्यमातून 1000 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहता येणार आहेत.


या नव्या प्लॅनमध्ये 16 हून अधिक भाषांतील चॅनेल्सचा समावेश असून, त्यापैकी 150 हून अधिक प्रीमियम चॅनेल्स उपलब्ध असतील. मनोरंजन, चित्रपट, बातम्या, लहान मुलांचे कार्यक्रम, लाइफस्टाइल तसेच विविध प्रादेशिक भाषांतील समृद्ध कंटेंटचा आनंद ग्राहकांना घेता येईल.


या पॅकमध्ये StarPlus HD, Colors HD, Sony Entertainment Television HD, Sony SAB HD, Discovery, Animal Planet, Sun TV Network, ETV यांसह देशातील प्रमुख ब्रॉडकास्टर्सचे अनेक लोकप्रिय चॅनेल्स समाविष्ट आहेत. मात्र, JioStar आणि Sonyचे स्पोर्ट्स चॅनेल्स या पॅकचा भाग नसतील.


या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फक्त ₹55 चे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर JioTV अॅपमध्ये आपल्या जिओ क्रमांकाने लॉग-इन करताच सर्व उपलब्ध प्रीमियम चॅनेल्स आपोआप सुरू होतील. यासाठी कोणत्याही स्वतंत्र अॅक्टिव्हेशन ची आवश्यकता नाही.


हा केवळ मनोरंजनासाठीचा पॅक असून, यामध्ये व्हॉइस कॉल किंवा एसएमएससारख्या सुविधा समाविष्ट नाहीत. या सेवेचा वापर करण्यासाठी ग्राहकांकडे सक्रिय जिओ प्रीपेड किंवा पोस्टपेड कनेक्शन असणे आवश्यक आहे. तसेच हा पॅक JioTV अॅपद्वारे एका वेळी केवळ एका मोबाईल डिव्हाइसवरच वापरता येईल.


जिओचा हा नवा ₹55 चा JioTV Pro Pack ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून रिचार्जसाठी उपलब्ध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता ग्राहकांना त्यांच्या आवडत्या टीव्ही मालिका, ताज्या बातम्या, मुलांसाठीचे कार्टून तसेच प्रादेशिक भाषांतील कार्यक्रमांचा आनंद अत्यंत परवडणाऱ्या किमतीत घेता येणार आहे.

Comments