आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

🌞 बुधवार, १ जुलै २०२६





निज ज्येष्ठ कृष्ण द्वितीया. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे."


🌙 नक्षत्र - पूर्वाषाढा / (सकाळी ६.५२ नंतर) उत्तराषाढा.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु / (दुपारी १.३२ नंतर) मकर. 


🔭 चंद्र त्रिकोण मंगळ.

🔭 चंद्र प्रतियुती बुध.

🔭 चंद्र प्रतियुती गुरू.


टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. चंद्र-मंगळ त्रिकोणामुळे धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. दुपारी ४ पूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करावीत.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. चंद्र-बुध प्रतियुतीमुळे संभाषणात गैरसमज निर्माण होऊ शकतात. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नियोजनबद्ध कामातून लाभ मिळेल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

कामाचा ताण वाढू शकतो. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. दुपारनंतर विश्रांती घेणे लाभदायक ठरेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस लाभदायक राहील.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल. नवीन योजना पुढे ढकलणे हितावह ठरेल.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. लहान प्रवासाचे योग संभवतात. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. नवीन खरेदीचा योग संभवतो.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

दुपारपर्यंत राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-मंगळ योगामुळे उत्साह आणि कार्यक्षमता वाढेल. महत्त्वाची कामे दुपारी ४ पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

दुपारी चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह वाढेल. नवीन योजना राबविण्यासाठी योग्य वेळ आहे. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. संध्याकाळनंतर परिस्थिती अधिक अनुकूल राहील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही जुन्या गोष्टींचा विचार मनात येईल. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक जाईल.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. नवीन योजना यशस्वी ठरतील.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments