खाशाबांचा ट्रिझर वादाच्या भोवऱ्यात


खाशाबांचा ट्रिझर वादाच्या भोवऱ्यात

न्यायालयीन आयोगावर शनिवारी सुनावणी




पुणे  ०२ सिटी न्यूज नेटवर्क 

बहुचर्चित खाशाबा चित्रपटांचा  ट्रिझर आज ऑनलाईन प्रर्दर्शित झाला असून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या ट्रिझरमधील 5 दृश्य ही लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील असल्याने न्यायालयीन आयोगाची नियुक्तीवर येत्या शनिवारी पुणे दिवाणी न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

न्यायालयात दावा सुरू असतानाही 1 मे रोजी चित्रपटगृहात खाशाबा चित्रपटाचा ट्रिझर प्रर्दशित केल्याने पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांचा कॉफीराईटबाबतचा दावा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह ज्योती देशपांडे, जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शनला नोटिस पाठवली होती. जुलैपर्यंत चित्रपट प्रदर्शित होत नसल्याचे नागराज मंजुळे यांचे वकील ॲड. रामकृष्ण कुलकर्णीं यांनी तोंडी जबाबात सांगितल्यानंतर  लेखक दुधाणे यांचे वकील ॲड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयीन  आयोगाची मागणीचा अर्ज दाखल केला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आयोगाने चित्रपट पाहावा आणि संजय दुधाणे यांचे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तकाचे वाचन करून निर्णय घेण्यात याचा असा अर्ज ॲड. सुवर्णा शिंदे सादर केला. न्यायाधिश अग्रवाल यांनी हा अर्ज मान्य केला असून  आता न्यायालयीन आयोगाची नियुक्ती अर्जावर 4 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.


खाशाबा चित्रपट हा संजय दुधाणे यांच्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तकावर आधारित असल्याचे तब्बल 19 पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 5 पुरावे चित्रपटाच्या ट्रिझरवरून, 4 पुरावे  नागराज मंजुळे यांनी केलेल्या 5 कोटीचा अब्रुनुकसान दाव्यात तर 6 पुरावे हे रणजीत जाधव यांच्याशी करार चित्रपटाच्या संदर्भात आहेत. हे सर्व 14 पुरावे ॲड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयात दाखल केले आहे. 


चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लेखक संजय दुधाणे यांच्यावर 5 कोटीचा अब्रुनुकसान दावा दाखल केला असून या दाव्यातील शपथपत्रातच कथा ही दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे पुरावे मंजुळे यांनी जोडले आहेत. मंजुळे यांच्या  दाव्यातच खाशाबा चित्रपट हा सोशल मिडियाच्या माहिती आधारे चित्रपट निर्माण करीत असल्याचे मंजुळे यांनी शपथपत्र दिले आहे. या शपथपत्रातील पान. क्रं. 215 व 215 वर दुधाणे यांच्या नावाचा कथालेखक म्हणून स्पष्ट उल्लेख आहे. याशिवाय मंजुळे यांनी जोडलेले तब्बल 4 संदर्भ  हे दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारीत आहेत.


चौकट

*पुस्तकातील दृश्य ट्रिझरमध्ये*

खाशाबा चित्रपटाचा ट्रिझरमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, खाशाबांचे प्राचार्य, इंग्रज अधिकारी, आणि बडोद्याचे माणिकराव, पंजाबी मल्लांवर झालेला अन्याय, कुस्तीसह मल्लखांब, खोखोतील अष्टपैलू खेळाडू  यांचे सीन स्पष्टपणे दिसतात.  हे सर्व संजय दुधाणे यांच्या पुस्तकात नाट्यमय रित्या लिहिले गेले आहे. 


ट्रेलरवरून कॉपीराईट पुस्तकातील पहिल्या प्रकरणातील पहिल्या पानावरील पानावरील प्रसंग जशाचा जसा चित्रपटात आल्याची खात्री येते यामुळे हा चित्रपट संजय दुधाणे यांच्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या पुस्तकावरच निर्माण झाल्या स्पष्टपणे दिसून येते. हा निव्वळ योगायोग निश्चितच नसल्याचा दावा लेखक संजय दुधाणे यांनी केला आहे. 


अधिक माहितीसाठी संपर्क  ः श्री. सागर ठाणेकर, समन्वयक - खाशाबा जाधव प्रबोधिनी  मो. 9423801280

Comments