श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ७ जुलैला दक्षिणद्वार सोहळा पार पडला



श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ७ जुलैला दक्षिणद्वार सोहळा पार पडला



श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) ०७ सिटी न्यूज नेटवर्क 

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात ७ जुलैला पहाटे ३ वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला. निज ज्येष्ठ कृष्ण सप्तमी अर्थात कालाष्टमीला झालेल्या या सोहळ्याची परिसरातील राज्यभरातून आलेले शेकडो भक्तगण वाट पहात होते. हा सोहळा म्हणजे दत्तभक्तांसाठी एक अपूर्व अशी पर्वणी असते. त्यामुळे दत्त भक्तांनी कृष्णा नदीत स्नान करून याचा लाभ घेतला. या प्रसंगी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, अशा नामघोषात भक्तांनी मंदिराची प्रदक्षिणा केली.


दक्षिणद्वार सोहळा म्हणजे काय ?

 

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वहाणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वहाते. जेव्हा कृष्णा नदीचे पाणी वाढते, तेव्हा हे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून मुख्य गाभार्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. श्रींच्या चरणांवरून येणार्‍या कृष्णा प्रवाहात स्नान केल्याने पापांचा र्‍हास होऊन पुण्याची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने भाविकांनी या सोहळ्यासाठी गर्दी केली होती.

Comments