जातनिहाय जनगणना संघर्ष यात्रेचे १ ते ७ ऑगस्ट कोल्हापूर ते जालना भव्य आयोजन - दिगंबर लोहार यांची माहिती
जातनिहाय जनगणना संघर्ष यात्रेचे १ ते ७ ऑगस्ट कोल्हापूर ते जालना भव्य आयोजन - दिगंबर लोहार यांची माहिती
कोल्हापूर ०५ सिटी न्यूज नेटवर्क
देशाची जनगणना जातीनिहाय व्हावीयासाठी या संसदेच्या अधिवेशनामध्ये सरकारवर दबाव वाढवण्यासाठी ओबीसी जनमोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली
आरक्षणाची जन्मभूमी लोकराजा राजर्षी शाहू छत्रपतींचे कोल्हापूर ते जालना जिल्ह्यातील माजलगाव येथील मंडल स्तंभ पर्यत दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान संघर्ष यात्रेची सुरुवात केली जाणार आहे सरचिटणीस लोहार यांनी दिली .
ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष व कोकण कुणबी समाज उन्नती संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बावकर आगरी समाजाचे दशरथ दादा पाटील यांचेसह महाराष्ट्रातील तमाम ओबीसी नेत्यांना या संघर्ष यात्रेत सहभागी केले जाणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना ओबीसी जनम मोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी संघर्ष यात्रेच्या मार्गाची माहिती दिली तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात संघर्ष यात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत होणार असल्याचे नमूद केले.
दिनांक एक ऑगस्ट रोजी शाहू समाधी स्थळ येथे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो ओबीसी महिला माता-भगिनी बांधव यांना सहभागी करून घेण्यासाठी नियोजन सुरू आहे.
आज चौंडेश्वरी मंदिर सभागृह देवांग कोष्टी समाज कार्यालय येथे ओबीसी जनमोर्चाचे आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष मोहन हजारे होते.
या बैठकीत सर्वश्री जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार पंडित, सचिन सुतार, अनिल खडके, संजय सुतार, संजय काटकर आदींनी मनोगते व्यक्त केली. शेवटी आभार ज्ञानेश्वर सुतार यांनी मानले. या बैठकीस विविध पदाधिकारी उपस्थित होते .

Comments
Post a Comment