केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्या 'लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्वभूषण पुरस्कार' वितरण
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्या 'लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्वभूषण पुरस्कार' वितरण
कोल्हापूर २ सिटी न्यूज नेटवर्क
पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने आयोजित 'लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्वभूषण पुरस्कार २०२६' वितरण सोहळा शुक्रवारी (ता. ३) दुपारी ३ वाजता कोल्हापुरातील नष्टे लॉन येथे उत्साहात पार पडणार आहे. समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा यावेळी राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
'वसा पोलिसांच्या सेवेचा...' हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या पोलिस मित्र असोसिएशनच्या या उपक्रमात भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी राहणार आहेत.
या सोहळ्यास माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रिया पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ, कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम वसंत-बहार रोड, कलेक्टर कार्यालयाजवळील महावीर गार्डन शेजारी, उद्योग भवनसमोरील नष्टे लॉन येथे दुपारी ३ वाजता होणार आहे.
पोलिस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे आणि महिला राज्याध्यक्ष डॉ. रजनीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य उपाध्यक्ष नियाज जमादार, टीम प्रमुख मिलिंद चव्हाण, राज्य संपर्कप्रमुख मुरलीधर शिंदे, इचलकरंजी महिला शहराध्यक्ष आशा वाघिरे, शहर उपाध्यक्ष सोहेल रंगरेज यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य सोहळ्याच्या तयारीत सहभागी झाले आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास कोल्हापूरसह राज्यभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments
Post a Comment