करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव सुरु
कोल्हापूर : प्रतिनिधी
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा उत्तरायणातील किरणोत्सव बुधवार, 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. किरणोत्सव मार्गातील अडथळे नोव्हेंबरमध्ये काढल्याने त्यावेळी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला होता. सध्या ढगाळ वातावरण, थंडी आणि धुके असल्याने किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. श्री अंबाबाईचा दरवर्षी नोव्हेंबर तसेच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असा दोनदा किरणोत्सव होतो. गेली काही वर्षे हा किरणोत्सव सोहळा तीन दिवस व्हायचा; मात्र त्याआधी व नंतरच्या दिवशीही सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीवर पडायची. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने किरणोत्सव पाच दिवसांचा होत असल्याचे जाहीर केले आहे. नोव्हेंबरमध्ये देवस्थान समितीने पुढाकार घेऊन महानगरपालिकेकडून तातडीने किरणोत्सव मार्गातील अडथळे हटविले. त्यामुळे ढगाळ वातावरण असले, तरी अखेरच्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या चेहर्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण झाला. तुलनेने जानेवारीत सूर्यकिरणे प्रखर असल्याने या कालावधीत किरणोत्सव होतो; मात्र गेले दोन-तीन दिवस थंडी आणि ढगाळ वातावरणाने सूर्यदर्शन लवकर होत नाही. पुढील दोन दिवसांत हे वातावरण बदलले, तर देवीचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल, असे अभ्यासकांचे मत आहे. किरणोत्सवादरम्यान तीन दिवस भाविकांना एक तासासाठी मंदिरात प्रवेश बंदी केली जाणार आहे. भाविकांची सोय व्हावी, यासाठी मंदिरात देवस्थान समिती कार्यालयाशेजारी व नगारखान्याच्या पुढे अशा दोन ठिकाणी एलईडी स्क्रीन लावून भाविकांना किरणोत्सव लाईव्ह पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Comments
Post a Comment