todays post 26 janevari 2019


साडेतीन वर्षोनी होणाऱ्या मराठी चित्रपट महामंडळाच्या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष

गोंधळ होऊ नये या साठी संचालक मंडळाची कसरत


कोल्हापूर 26 राजेन्द्र मकोटे वृत्त संपादक 
समस्त मराठी चित्रपट विश्वाची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची कायद्याने प्रतिवर्षी होणे गरजेची असलेली वार्षिक सर्वसाधारण सभा तब्बल साडेतीन वर्षोनी रविवारी ,२७ जानेवारीस होत आहे..या अगोदरच्या सभांमधून झालेला टोकाचा गोंधळ , सभात्याग आणि बाचाबाचीचे लागलेले गालबोट पाहता आणि त्या मुळे झालेली बदनामी पाहता,किमान ही सभा तरी खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावी अशी अपेक्षा समस्त चित्रपट सृष्टी तून व्यक्त होत आहे. 
मुळच सदर वार्षिक सभाना लागलेला साडेतीन वर्षोचा वेळ व अनेक प्रलबिंत समस्याकडे अघिकार असूनही महामंडळ पदाधिकारी - संचालकानी केलेले दुर्लक्ष या मुळे सभासदामघ्ये मोठी नाराजी आहे.यांचे आक्रमक प्रतिसाद या सभेत ऊमटण्याची दाट शक्यता आहे.यांची कल्पना असल्यानेच या पाश्वेभुमीवर विघमान अघ्यक्ष मेघराज भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रपट महामंडळाकडे आठ कोटीठेवी जमा आहेत, या सह सभासद हिताचे अनेक निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. मात्र सभेमघ्ये ते विचारल्या जाणारे प्रश्नाचे तणाव वाढू न देता कसे काय समाघान करतात ,या विषयी मोठी ऊत्सुकता लागून राहीली आहे...विद्यमान कोल्हापूर चे स्थानिक आणि पुणे - मुंबईतील संचालकातही एकसुरीपणा नसल्याचे या अगोदर दिसुन आले आहे.यांचे कोल्हापूर चे संचालक रणजित जाघव यांनी दिलेला पण मंजुर न झालेला राजीनामा हे एक प्रातिनिधीक ऊदाहरण आहे. या विविध पैलुनी पाहता रविवारी मुख्यालय कोल्हापूरला शाहू सभागृहात होणारी ही सर्वसाधारण सभा विना गोंधळ पार पाडण्यात मेघराज भोसले आणि टीम चा समन्वयी संयमाचा कस लागणार आहे..चित्रतपस्वी भालजी पेंढारकर ,ना.सी.फडके ते यशवंत भालकर अशी मोठी पंरपंरा असलेल्या व मोठी कार्यक्षमता असलेल्या या अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाने नव्याने कात टाकून कार्यरत होण्यासाठी या सभेत सगळ्यांनीच ईगो पाँईट व राजकारण न करता व्यापक मराठी चित्रपटसृष्टीचे हित लक्षात घेऊन सहभागी व्हावे अशीच अपेक्षा तमाम महाराष्ट्रातील कलाविश्वाकडून व्यक्त होत आहे.

Comments