जागतिक क्षयरोग जनजागृती सप्ताह





कोल्हापूर 19 प्रतिनिधी:
जिल्हा क्षयरोग केंद्र कोल्हापूर यांच्यामार्फत दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी या दिनानिमित्त क्षयरोग सप्ताहाचे आयोजन 19 मार्च ते 24 मार्च दरम्यान करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षीच्या सप्ताहामध्ये आशा वक्तृत्व स्पर्धा ,आरोग्य कर्मचारी यांच्या क्षयरोग जनजागृती विषयी स्लोगन स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,पोस्टर स्पर्धा ,शाळा कॉलेज येथे वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा, तसेच सीपीआरमधील रुग्णांना फळे वाटप इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हास्तरावर केले आहे.
कार्यक्रमासह सीपीआर येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन सकाळी साडेसात वाजता केले आहे तसेच विविध शाळेतील मुले शिक्षक सेवाभावी संस्था नागरिक मान्यवरांचा सहभाग असणार आहे तसेच यावर्षी मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी शाहू स्मारक दसरा चौक येथे सकाळी 11 ते 2 त्यावेळी या वेळेत मुख्य कार्यक्रम साजरा केला जाणार आहे या कार्यक्रमामध्ये डॉ. अनिल मडके यांचे क्षयरोगावर प्रबोधनपर व्याख्यान ,यासारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . यावेळी जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ उषा कुंभार आदी उपस्थित होते.
-

Comments