रंगपंचमी : रंगाचा अनोखा उत्सव



कोल्हापूर २५ :

          फाल्गुन कृष्ण पंचमी  या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंग पंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो. सर्वजण रंगांत न्हाऊन निघतात. परस्परांंवर पाणीही उडवले जाते.



अलीकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात. रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजतात. पूर्वी होळी म्हटले, की फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ अशा हर्बल पदार्थांपासून रंग तयार केले जायचे. या रंगांमुळे रंगपंचमीचा आनंद द्विगुणित होई.

Comments