आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

तीन पिढ्यातील श्रोता वर्गासमावेत आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न 

     कोल्हापूर: तळकोकणापासून बेळगांव  सीमाभाग ते थेट कराड लगतच्या श्रोता वर्गाचे गेली सत्तावीस वर्ष निखळ मनोरंजन करणाऱ्याआकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला . नातवा पासून आजोबा पर्यंतच्या तीन पिढीतील श्रोता वर्गाचे  गेली सत्तावीस वर्ष कोल्हापूरकरांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम, मनोरंजन, व विविध बातमी  सेवा दिली आहे. अशी तटस्थ सेवा देऊन कोल्हापूर आकाशवणी केंद्राने देऊन आपले स्थान भक्कम केले असून भविष्यात त्यांची व्याप्ती वाढवली जाईल ' असे केंद्र प्रमुख तनुजा कानडे यांनी या प्रंसगी सांगितले , तर तांत्रिक विभाग प्रमुख सतिश पडककर यांनी नविन तांत्रिक बदला सह अधिक कार्यक्षेत्रात आकाशवाणी कोल्हापूर १०२ .७ वरून अधिक दमदारपणे पोहचेल ' अशी माहिती दिली .        यावेळी उमा टॉकीज येथील इंडो बेकरी चे मुसा मिरशिकारी यांनी खास कलात्मक बनवलेला केक कानडे व पडळकर यांनी कापला .
  अशा या कोल्हापूर आकाशवाणीच्या 27 व्या वर्धापननिमित्त ताराबाई पार्क येथील कार्यालयात भेट देवून डॉ . संदीप पाटील , भूल तज्ञ डॉ . किरण भिगार्डे , दै . पुढारी चे विजय पाटील , दै . सिंधुदुर्ग समाचार चे  पत्रकार अशिष कदम , स्वामी विवेकानंद ट्रस्ट चे राजेंद्र मकोटे , उदय कुलकर्णी , रवी कुलकर्णि सह सीमा जोशी , कमलाकर वर्टेकर, सुरेश राठोड,  परिवर्तन चे अमोल कुरणे अशा विविध क्षेत्रातून मान्यवर उपस्थित होते. त्यांचे आकाशवाणी वतीने  स्वागत चिपळूणकर -  गायकवाड - मांडरे सह अधिकारी कर्मचारी वर्गाने केले . यावेळी आयोजित रक्तदान शिबीरात  सीपीआर ब्लड बँकेने 3४ युनिट रक्त संकलित केले .दिवसभर पंचक्रोशीतील श्रोता वर्गाने भेट देत शुभेच्छा देत उत्सुकतेने तांत्रिक पाहणी ही केली




Comments