हातकणंगले लोकसभा निवडणूक २०१९
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा दारुण पराभव
हातकणंगले :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि उमेदवार राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून पराभव झाला आहे. हातकणंगलेतील मतदारांनी शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या बाजूने कौल दिला आहे. देशपातळीवर शेतकरी नेता म्हणून ओळख असलेल्या राजू शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात होता, मात्र हातकणंगलेच्या मतदारांनी त्यांना नाकारले. या मतदारसंघात शेतक-यांसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे आपल्या विजयाची त्यांना खात्री होती. शिवसेनेने धैर्यशिल माने यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवून आपले डावपेच खरे ठरवले. वंचित आघाडीने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली होती.
Comments
Post a Comment